गोनवडी ग्रामस्थांची

1) गोनवडी ग्रामस्थांची इच्छा आहे की येथे एस.टी ची व्यवस्था व्हावी.
2) गोनवडी येथे दूध डेअरी असावी.
3) प्रशस्त ग्रामपंचायत इमारत असावी.
4) गोनवडी येथील चौथी शाळेनंतर पिंपरी बु येथे शाळेस जावे लागते म्हणून कोल्हापूर पध्दतीचे बंध्या–यास कठडे बांधून मिळावे.
5) बालवाडी इमारत मिळावी.
6) गोनवडी गावासाठी एक वेस आसावी.
7) शाळेस वॉलकंमाउंड.
8) गोनवडी येथे व्यायाम शाळा असावी.
9) गावात वाचनालय असावे.  गोनवडीत शाळा/ग्रामपंचायतेसाठी कॉम्प्युटरची गरज
10) गोनवडी ओटयावर छोटे छोटे बंधारे असावे.
11) शिवार रस्ता खंडीकरण असावे.
12) स्मशानभूमी रस्ता खडीकरण असावे.
13) पिंपरी खु. येथील ठाकर वस्तीस समाजमंदीर असावे.
14) पिंपरी खु /सेहकाल/गोनवडी रस्ता डांबरी करावा.

गोनवडी गांव पुणे नाशिक रोड पासून 9 कि.मी. वर आहे.  गावाचे प्रथम सरपंच रामचंद्र बाबुराव मोहिते गावाचे पंचायत समिती सदस्य रामचंद्र बाबूराव मोहिते निवडून आले गावात 1967 साली प्रथम लाईट आली.  मोहिते यांच्या प्रयत्नातून गोनवडी गावचे श्री. सदाशिव भाउ पवळे यांनी प्रथम लाईट मागणी करुन स्ट्रेट लाईट गोनवडी गावात आली.  त्यानंतर 1972 रोजी गोनवडी, बोरदरा, बिरदवडी, चाकण येथे 1972 मध्ये दुष्काळ पडला रोजगार हमी योजनेतून खेड तालुक्यात प्रथम लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला गेला श्री मोहिते यांनी 1967 साली लिट इरीगेशन करुन कोरडवाहू शती बागयती शेती केली.  पंचायत समिती सदस्य झाले.  नंतर गोनवडी पिंपरी बु. दोन्ही गावाच्या मधून वाहणा–या भामा नदीवर टेल्को कंपनी व सरकार याच्या माध्यमातून गोनवडी , पिंपरी बु. साठी कोल्हापूर पध्दतीचा बंधारा मा0 ना. रामराव आदिक यांच्या हस्ते भूमिपूजन करुन काम पूर्ण केले गोनवडी येथे इयत्ता 4 थी पर्यंत शाळा 80 ते 84 याकाळापर्यंत मारुती मंदीरात भरत असे त्यानंतर श्री. मोहीते यांनी जि.प. प्राथमिक शाळेस एक खाली मंजूर करुन शाळेचा प्रश्न सोडवला पंचायत समितीत काम करताना गोनवडी गावासाठी आरोग्य उपकेंद्र मंजूर करुन रोहकल, गोनवडी , पिंपरी बु. व ठाकर वस्ती यांचा आरोग्याचा प्रश्न सुडवला.  1991 मध्ये गोनवडी चे सरपंच म्हणून देवराय आनंदराव काळे हे सरपंच झाले त्यांनी गोनवडी ग्रामपंचायतेसाइी इमारत व आगंणवाडीसाठी इमारत मंजूर करुन बांधकाम केले व पिंपरी बु. साठी एक आंगणवाडी बांधली त्या इमारती आज मोडकळीस आल्या आहेत.  1995 रोजी बीसी. राखीव जागेवर शांताराम दामु पवार हे गोनवडीचे सरपंच म्हणून निवडून दिले त्यांनी ठाकरवस्ती व गोनवडी येथे