इतिहास
11 घरकुले मंजूर करुन त्याचे काम पूर्ण केले त्यांच्या काळात आरोग्य उपकेंद्राची इमारतीचे काम पूर्ण करुन घेतले त्यावेळेस त्यांना उपसरपंच म्हणून दिनेश मोहिते यांनी सहकार्य केले. 2000 साली तनाजी मोहिते सरपंच झाले त्यांनी गोनवडीमध्ये फक्त सार्वजनिक तळे रोजगारी हमी योजनेखाली काम केले आणि आपला कार्यकाल संपवला. श्री दिनेशराव रामचंद्र मोहिते यांनी 2005 ला सरपंच म्हणून काम पाहिले त्यांनी शरद बुट्टे यांच्या फंडातून जि.प्रा.शाळेस वॉटर फिल्टर मंजूर आमदार दिलिप मोहिते यांच्या सहकार्यातून पूरहानी योजनेतून गोनवडी ओढयावरील मोटी दुरुस्त केली.
12 वित्त आयोगातून गोनवउी ग्रामपंचायत इमारत दुरुस्त, जि.प. माध्यामातून आंगणवाडीस खेळणी, शरद बुट्टे पाटील जि.प सदस्य यांच्या फंडातून आंगणवाडी दुरुस्त, जि.प माध्यतातून आरोग्य केंद्रासाठी खाट, त्यासाठी लागणारे साहित्य.
गोनवडी पिंपरी स्ट्रिट लाईट थकित बिल भरुन स्ट्रिट लाईट व्यवस्था पूर्ण, निर्मल ग्रामसाठी सहभाग घेवून आज रोजी 95 टक्के निर्मल ग्राम पूर्ण , संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत गोनवडी शिवार रस्ता पूर्ण करुन दोन वेळा मुरुमीकरण केले, शरद बुट्टे पाटील यांच्या फंडातून गोनवडी स्मशानभूमी रस्ता पूर्ण , पिंपरी खु. ते नाशिक रोड मा. आमदार दिलिप मोहिते यांच्या सरपंच दिनेश मोहिते यांच्या प्रयत्नातून खडीकरण रस्ता पूर्ण, मा. आमदार यांच्या सहकार्यातून गोनवडी / पिंपरी खु. गावे जोडण्यासाठी साकव पूलाचे काम पूर्ण , पुन्हा गोनवडी येथे पूरहानी योजनेतून एक मोरी मंजूर करुन पूर्ण, सर्व शिक्षा मोहिमे अंतर्गत दोन खोल्या शाळेसाठी मंजूर करुन काम पूर्ण, शाळेसाठी ग्राउंड रिलायन्स कंपनी व ग्रामपंचायत माध्यमातून पूर्ण, शाळेसाठी भारत निर्माण अंतर्गत तालुक्यात प्रथम शाळेसाइी पाण्याची टाकी काम पूर्ण, शाळेसाठी स्वत: दिनेश मोहिते यांच्या मोटारच्या सहाय्याने शाळेसाठी पाणी कनेक्शन दिले, संपूर्ण ग्रामीण योजने अंतर्गत तिन संडास काम पूर्ण
महिंद्रा कंपनीकडून सहकार्य म्हणून पाणीपुरवठा आपल पाणी योजनेसाठी 10: रक्कम सर्व ग्रामस्थासमोर कंपनी अधिकारी यांचे समोर पाणीपुरवठा योजनेसाठी खातेजमा आपल पाणी योजनेसाठी श्री. वसंतराव तनपुरे यांनी विहिरीसाठी जागा दिली, पाण्याच्या टाकीसाठी सर्जेराव मोहिते यांनी जागा दिली. रिलायन्स व आमदार यांच्या सहकार्यातून गोनवडी ते बिरदवडी रस्ता मुरमीकरण पूर्ण, शाळेच्या वॉल कम्पाउंड साठी पुन्हा सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत 100 फूट कामासाठी मंजूरी मिळून काम पूर्णत्वाकडे, शाळेसाठी जि.प. माध्यमातून शाळेसाठी खेळणी , शाळेसाइी कैलास मोहिते यांच्या सहकार्यातून शाळेसाठी मिटर लाईट व्यवस्था पूर्ण, शाहेस संडास / मुतारी / ग्रामपंचायतेसाठी संडास / आंगणवाडीसाठी शौचालय पूर्ण. सरपंच दिनेश मोहिते यांच्या प्रयत्नातून कृषी खाते अंतर्गत छोटे छोटे तिन पाझर तलाव हरीजन समाजासाठी त्याचे फायदे, पिंपरी खु. येथे सर्व शिक्षण मोहिमेअंतर्गत एक खाली मंजूर करुन काम पूर्ण, पिंपरी खु. येथे पाटील वस्तीसाठी शरद बुट्टे पाटील जि.प. फंडातून रस्त्याचे काम पूर्ण, गोनवडी येथे समाजकल्याण विभागाकडून स्माशानभूमी मंजूर करुन काम पूर्णत्वाकडे, गोनवडी येथे पंचायत समिती खेड बारावा वित्त आयोग तफर्े स्मशानभूमी संरक्षण भिंत मंजूर, गोनवडी, बिरदवडी, बोरदरा, रस्ता पंतप्रधान सडक योजनेतून रस्त्याचे कामाचे भूमिपूजन केले आहे. गोनवडी ग्रामस्थ व बुट्टे पाटील यांच्या सहकार्यातून व सरपंच साहेब यांचे सहकार्यातून शाळेस बेंच व्यवस्था मुलांना बसण्यासाठी बेंचचे काम पूर्ण, पिंपरी खु. शाळेस ग्रामस्थ व बुट्टे पाटील व सरपंच साहेब यांच्या प्रयत्नातून बेन्चेस काम पूर्ण.
संबंधित शेतक–यांनी आपापले शेतीला त्याची सोय करुन जवळपास 50 टक्के शेती बागायती झाली. शेतक–यांना सुबत्ता येवून शेतक–यांची आर्थिक परिस्थितीत सुधारणेस वाव मिळत होता. गावातील इतर मूलभूत कामे म्हणजे शाळा, ग्रामपंचायत कार्यालय बालवाडी तसेच या भागासाठी आरोग्य उपकेंद्रांची इमारत अशी कामे रामचंद्र मोहिते हे त्यावेळेच्या आंबेठाण शिवे या पंचायत समितीचे गटोच प्रतिनिधी होते त्यांचे अथांग प्रयत्नातून जवळपास 30 गावाला शाळेच्या खोल्या , इमारती , बालवाडी इमारती अशी कामे मोठया प्रमाणात झाली तसेच या मतदार संघात प्रामुख्याने विज पुरवठाही झाला तसेच मतदार संघात प्रामुख्याने विज पुरवठा ही मोठया प्रमाणात करुन सर्व ग्रामस्थांना लाईटच सोय , आप्रोच रोड रस्ते व इतर सर्वांगीन विकासाचे कामे करणेत येत होती पंतप्रधान , बीरदवडी, गोनवडी व बोरदरा, या गावाचा पंतप्रधान सडक योजनेच्या डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन होवून प्रत्यक्ष डांबरीकरण कामास सुरुवात होत आहे. इतरही गावातील स्थानिक रस्ते व इतर कामे ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच दिनेशराव मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली सुरु आहेत.
गोनवडी गाव भामा नदी तिरी वसलेले गावाला गोनवडी नाव कसे पडले याचा अंदाज येत नाही. पुरस्कार– सरपंच दिनेश मोहिते अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ यांजकडून सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय एकात्मता जोपसल्याबद्दल सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानीत तद्नंतर निर्मल ग्राम म्हणून निवड झालेली आहे. गोनवडी गावचे ग्रामदैवत म्हणून बापुजीबुवा महाराज व हनूमान मंदिर व द्रिंकनाथ महाराज यांचे मंदिरे गावठाण मध्ये आहेत. गावाचे धार्मिक स्थळे म्हणून गोनवडी गावठाण नदी काठी पांडवकालीन महादेवाची पिंड नदी आहे त्याप्रमाणे जालिंदर नाथ महाराज याचे शिष्य द्रिकंनाथ महाराज यांचे मंदिर आहे या धार्मिक स्थळाची माहिती ग्रामस्थांना 25 आॅक्टोंबर 1997 रोजी अॅड. उज्वल निरगुडकर यांना दृष्टांत रुपाने झाली त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या सांगणेवरुन 1936 साली मिटकर महाराज त्याठिकाणी अन्नदान केले होते ते अन्न कितीही लोक जेवले तरी संपले नव्हते. उत्सव चैत्र शु.3 या दिवशी दर साल ग्रामस्थ सात दिवसाचा सप्ताह किंवा बैलगाडे भजनी भारुडे किंवा तमाशा असे कार्यक्रम ठेवून करतात तसेच गोनवडी गावची आज रोजी लोकसंख्या 450 च्या आसपास आहे ग्रामपंचायत उत्पन्न 30 ते 45 हजार आसपास आहे. नदीकाठीला क्षेत्र बागायत क्षेत्र आहे व जास्त क्षेत्र डोंगर माळराण व जिरायत क्षेत्र जास्त आहे. आज रोजी ब–याच क्षेत्रावर काही बागायती व जिरायत क्षेत्रावर क्षेत्र म्हणून आरक्षित केले आहे. उत्पन्नाची साधने शेती व दूग्ध व्यवसाय व शेजारील चाकण एमआयडिसी मध्ये टेम्पररी कामाला जाने. गावात विविध योजना सरपंच दिनेश मोहिते यांच्या काळात 1) निर्मल ग्राम 2) पाणीपुरवठा आरोग्य केंद्र 3) शाळेची सुविधा 4) रस्ते 5) लाईट विविध योजना राबविल्या आहेत त्याचप्रमाणे राहिलेल्या योजना गाव तंटामुक्त / गाव आरोग्य ग्राम/ हरीत शाळा/ गावातील गटर / व्यायामशाळा / वाचनालय /शाळेला कॉम्प्युटर , ग्रामपंचायत कॉम्प्युटर योजना येणे बाकी आहे.
कृषी पर्यटन स्थळ म्हणून रोजगार उपलब्ध करता येवू शकतो त्याचप्रमाणे हरीतगृह उभारुन किंवा शेती पूरक व्यवसाय शेळी पाळण किंवा मोठा दूग्ध व्यवसाय करण्यास या ठिकाणी भरपूर वाव आहे.
गोनवडी ग्रामपंचायत आज रोजी असणारे पदाधिकारी–
सरपंच– श्री. दिनेशराव रामचंद्र मोहिते, उपसरपंच– पोपट गणपत मोहिते, सदस्य:– कैलास शंकर काळे, खंडू विष्णु म्हसुडरे, अलका मोहिते, अलका शांताराम पवार, देवदत्त सांडभोर, शांताराम दामु पवार, ग्राम पंचायत गोनवडी एक जागा रिक्त आहे.
निर्मल ग्राम समिती:– सुभाष सदाशिव मोहिते– अध्यक्ष,